चिनके (जिल्हा सोलापूर) येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन !
चिनके (जिल्हा सोलापूर), १० सप्टेंबर (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या उपस्थितीत श्रीराम मंदिर येथे रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासनाची पुनर्स्थापना करण्याच्या नियोजनाच्या संदर्भात धारकर्यांची बैठक पार पडली. या बैठकीत रायगडावर पुनर्स्थापित करण्यात येणार्या ३२ मण सुवर्ण सिंहासनाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नियोजन करण्यात आले. या वेळी डॉ. नवनाथ मिसाळ, डॉ. मानस कमलापूरकर, सर्वश्री मयुरेश गुरव, कृष्णा कांबळे, अनिल वाघमोडे, धनाजी कवठेकर, सचिन काटे, सचिन पवार यांसह अन्य धारकरी उपस्थित होते.
१. सांगोला तालुक्यातून २ सहस्र धारकर्यांच्या ‘खडा पहारा गटा’च्या नाव नोंदणीचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. या वेळी अनेक शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी केली.
२. पू. भिडेगुरुजी यांनी बैठकीमध्ये विषय मांडताना दैनिक ‘सनातन प्रभात’ या गावात येतो का ?, असे आवर्जून विचारले.
३. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष पाटणे यांनी पू. भिडेगुरुजी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’ भेट दिला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.