नगर येथे पोलिसांच्या जाचाला कंटाळून मुलाने आत्महत्या केल्याचा मुलाच्या आईचा आरोप !
नगर, ९ सप्टेंबर – येथील शेवगाव तालुक्यातील चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून आदित्य भोंगळे या तरुणास पोलिसांनी चौकशीसाठी कह्यात घेतले होते. चौकशीअंती सोडून दिल्यानंतर ‘पोलिसांनी आपल्याला मारले आहे’, असे सांगत भयभीत झालेल्या आदित्यने घराशेजारील बांधकाम चालू असलेल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्यामुळे ‘पोलिसांच्या जाचाला कंटाळून आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप’ मुलाच्या आईने केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सदर तरुणाने भ्रमणभाषवरून कुणाला तरी पैसे पाठवल्याचे सांगण्यात येत असून या प्रकरणाच्या अन्वेषणाची मागणी नातेवाइकांनी केली होती.