लुधियाना (पंजाब) येथील एका बेकरी व्यावसायिकाने ‘इको फ्रेंडली’ म्हणून बनवली चॉकलेटची श्री गणेशमूर्ती !
‘इको फ्रेंडली’च्या नावाखाली हिंदु धर्मावर आघात !
गेल्या काही वर्षांपासून ‘इको फ्रेंडली’ सण साजरा करण्याचा प्रघात केवळ हिंदु धर्मासाठीच जाणीवपूर्वक पाडला जात आहे. दुसरीकडे मात्र मोहरम, बकरी ईद आदी सण त्या धर्माच्या परंपरेनुसार पर्यावरणाला लाथाडून साजरे केले जात आहेत. याविषयी मात्र कुणीच बोलत नाहीत. कुणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला ‘धर्मांध’ संबोधून त्याची हेटाळणी केली जाते, हे लक्षात घ्या !
लुधियाना (पंजाब) – येथील बेकरी व्यावसायिक हरजिंदरसिंह कुकरेजा यांनी श्री गणेशचतुर्थी निमित्त चॉकलेटची श्री गणेशमूर्ती बनवली आहे. ही मूर्ती पहाण्यासाठी लोक मोठ्या संख्येने बेकरीबाहेर गर्दी करत आहेत. ‘इको फ्रेंडली’ म्हणून त्यांनी ही मूर्ती बनवल्याचे सांगितले. ते गेल्या ६ वर्षांपासून चॉकलेटची मूर्ती बनवत आहेत. कुकरेजा म्हणाले, ‘‘इको फ्रेंडली’ पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जाऊ शकतो’, असा संदेश आम्हाला यातून द्यायचा आहे.’’ ‘पर्यावरणाला हानी ठरणार्या गणेशमूर्तींचा अल्प वापर करावा’, असे आवाहन त्यांनी केले. (‘पर्यावरणाला हानी ठरणारी बकरी ईद साजरी करू नका’, असे आवाहन करण्याचे धाडस कुकरेजा करू शकतील का ?- संपादक)