सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे निरंजन आवटी विजयी
सांगली, १० सप्टेंबर (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे निरंजन आवटी यांचा विजय झाला आहे. निरंजन आवटी यांनी काँग्रेसचे फिरोज पठाण यांचा २ मतांनी पराभव केला. आवटी यांना ९, तर पठाण यांना ७ मते मिळाली. या निवडीमुळे सलग तिसर्या वर्षी स्थायी समिती सभापतीपद मिरजेला मिळाले आहे. १६ सदस्यीय स्थायी समिती सभेत ९ भाजप, काँग्रेसचे ४, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ सदस्य आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली.