‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी कार्यक्रमाच्या विरोधात ठाणे जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठांमध्ये संताप !
अंबरनाथ, उल्हासनगर आणि भिवंडी येथील नायब तहसीलदार यांना निवेदन
ठाणे, १० सप्टेंबर (वार्ता.) – ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी कार्यक्रमाचे आयोजन जागतिक स्तरावर करण्यात आले आहे. या विरोधात जगभरातून प्रतिक्रिया येत असून हिंदूंंमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. या कार्यक्रमाला भारतातून साम्यवादी विचारांचे कट्टर पुरस्कर्ते वक्ते संबोधित करणार असल्याचा, तसेच जगभरातील ४० हून अधिक विद्यापिठेही सहभागी असल्याचा दावा आयोजकांनी केला होता; मात्र जगभरातील हिंदूंच्या जोरदार विरोधामुळे यातील अनेक विद्यापिठांनी ‘आमचा या कार्यक्रमाशी संबंध नाही’, असे घोषित करून या कार्यक्रमातून माघार घेतली आहे. जागतिक स्तरावर हिंदुद्वेष पसरवण्याचे हे मोठे षड्यंत्र पहाता, ठाणे जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. ‘या कार्यक्रमाला भारत सरकारने विरोध करावा’, या मागणीचे निवेदन जिल्ह्यातील अंबरनाथ, उल्हासनगर आणि भिवंडी येथील नायब तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
अंबरनाथ येथे नायब तहसीलदार श्री. शिवाजी शेलार आणि उल्हासनगर येथील नायब तहसीलदार श्री. गणपत शिंगाडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी स्वदेशी भारत अभियानाचे श्री. राजेश मिश्रा, योग वेदांत सेवा समितीच्या बदलापूर येथील आश्रमाचे व्यवस्थापक श्री. सीतारामजी भाई, श्री. नंदकिशोर शुक्लाजी, श्री. सचिन कलबुर्गी, श्री. भूषण पांडे, श्री. अतुल शिरसाट, श्री. सूर्या पटेल आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. वीरेश अहीर हे उपस्थित होते, या आशयाचे निवेदन भिवंडी येथील तहसीलदार आदिक पाटील यांनाही देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. रूपेश पुण्यार्थी, अधिवक्त्या पूजा ताले, विश्व हिंदू परिषदेचे भिवंडी येथील अध्यक्ष श्री. देवराज राका आणि श्री. प्रभाकर बेत्ती, श्री. पवन तलकोकुला आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
पालघर जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन
पालघर – ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या ऑनलाईन आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, तसेच तहसीलदार सुनील शिंदे यांना निवेदन दिले आहे. निवेदनातून ‘या कॉन्फरन्सचे आयोजक, यामध्ये सहभागी होणारे आणि यांना साहाय्य करणारे यांच्यावर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी या करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ‘वसुधैव कुटुम्बकम्’ अशी शिकवण देणार्या हिंदु धर्माविषयी ‘हिंदु फॅसिझम’सारखे शब्द वापरून हिंदु धर्म आणि हिंदुत्व यांना अपकीर्त करण्याचे षड्यंत्र यामागे आहे. यामधून हिंदु धर्माची वस्तूस्थिती नाकारून खोटा प्रसार केला जाणार आहे. यामधील काही सूत्रे ही देशातील नोटबंदी, नागरिकत्व सुधारणा कायदा यांविषयी आहेत, ज्यायोगे भारताची राजकीय धोरणेही अयोग्य असल्याचा प्रचार केला जाणार आहे. या कॉन्फरन्सचे आयोजन आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असल्याने जगभरात यामधून हिंदु धर्म आणि हिंदुत्व यांविषयी खोटी माहिती जाईल.
निवेदन देतांना अधिवक्ता किसन यादव, अधिवक्ता मुरलीधर क्षीरसागर, महाराष्ट्र प्रदेश वारकरी संप्रदाय तीर्थक्षेत्र समिती कार्यकारीप्रमुख श्री. सुभाष बन, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंडित चव्हाण, सनातन संस्थेचे श्री. राजेश कांबळे आणि सनातन प्रभातचे वाचक श्री. महेश मुळे, श्री. धनराज गुप्ता उपस्थित होते.
अमेरिकेत होणार्या ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या विरोधात जळगाव येथे हिंदू राष्ट्र सेनेचे आंदोलन !
जळगाव – ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करणारे, यामध्ये सहभागी होणारे आणि यांना साहाय्य करणारे यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात यावेत, या मागणीसाठी ५ सप्टेंबरला शहरातील शास्त्री टॉवर चौकात हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी, केंद्रीय गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांना देण्यात आले. जिल्हाधिकार्यांच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती भारंबे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी हिंदू राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख मोहन तिवारी यांच्यासह सर्वश्री सुशील इंगळे, जितेंद्र नारखेडे, रूपेश माळी, धनंजय माळी, स्वप्नील महाजन, भूषण सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.