पुणे येथील मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना यंदाही साधेपणाने !
पुणे, ९ सप्टेंबर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या गणेशोत्सव मंडळांसह सर्व सार्वजनिक मंडळांच्या वतीने यंदाही उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. मानाच्या ५ गणपतींसह प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना १० सप्टेंबर या दिवशी दुपारपर्यंत होणार आहे. मानाचा पहिला कसबा गणपति, दुसरा तांबडी जोगेश्वरी, तिसरा गुरुजी तालीम यांच्या ‘फेसबूक पेज’वर, तर तुळशीबाग मंडळाच्या ‘यू ट्यूब’वर प्रतिष्ठापनेचा सोहळा आणि ‘श्रीं’च्या दर्शनाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.