वर्धा येथे अतीवृष्टीमुळे घर कोसळल्याने दांपत्यांचा मृत्यू, मुलगा गंभीर घायाळ !
वर्धा – येथे अतीवृष्टीमुळे अनेक घरे कोसळली आहेत. जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील दहेगा आणि गोंडी येथे पावसामुळे घरे कोसळल्याने यामध्ये पती रामकृष्ण चौधरी आणि पत्नी ज्योती यांचा मृत्यू झाला असून मुलगा कु. आदित्य हा गंभीर घायाळ झाला आहे. ९ सप्टेंबर या दिवशी पहाटेच्या वेळी ही घटना घडली आहे. घायाळ अवस्थेतील कु. आदित्य याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. ‘वर्धा येथे गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतीवृष्टीमुळे अंदाजे ४० घरे कोसळली आहेत’, अशी माहिती तहसीलदार चव्हाण यांनी दिली.