‘कागदी लगद्यापासून बनवलेली श्री गणेशमूर्ती’ उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक असणे आणि ‘सर्वसाधारण मातीच्या श्री गणेशमूर्ती’च्या तुलनेत ‘सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत श्री गणेशमूर्ती’ उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायक असणे
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी
‘सर्व संप्रदायांना पूज्य आणि संतांनी गौरवलेले दैवत, म्हणजे श्री गणेश ! प्रत्येक संप्रदायात गणेशपूजा आहे. अनेकांच्या नित्य पूजनातही श्री गणेशमूर्ती असते. श्री गणेशाची मूर्ती सात्त्विक असेल, तरच उपासकाला गणेशतत्त्वाचा लाभ मोठ्या प्रमाणावर होतो. स्वयंभू मूर्ती, संतांनी स्थापन केलेली मूर्ती आणि अध्यात्मशास्त्रानुसार बनवलेली मूर्ती यांमध्ये देवतेचे तत्त्व आकृष्ट अन् प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असते, म्हणजे अशा मूर्ती सात्त्विक असतात. ‘कागदी लगद्यापासून बनवलेली श्री गणेशमूर्ती, सर्वसाधारण मातीची श्री गणेशमूर्ती (टीप १) आणि सनातन-निर्मित शास्त्रीय (अध्यात्मशास्त्रानुसार बनवलेली आणि सात्त्विक असलेली) रंगीत श्री गणेशमूर्ती (टीप २) यांचा त्यांच्या भोवतीच्या वायूमंडलावर काय परिणाम होतो, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी २.८.२००८ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (‘ऑरा’चा) अभ्यास करता येतो. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
टीप १ – ही पेठेत (बाजारात) मिळणारी सर्वसाधारण मातीची श्री गणेशमूर्ती आहे.
टीप २ – ही मूर्ती साधक-मूर्तीकारांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीभावाने बनवली आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत श्री गणेशाची मूर्ती पटलावर (‘टेबला’वर) ठेवण्यापूर्वीच्या वातावरणाचे ‘पिप’ तंत्रज्ञानाद्वारे छायाचित्र घेतले. ही ‘मूलभूत नोंद’ (Baseline Reading) होय. त्यानंतर कागदी लगद्यापासून बनवलेली श्री गणेशमूर्ती, सर्वसाधारण मातीची श्री गणेशमूर्ती आणि सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत श्री गणेशमूर्ती एकेक करून पटलावर ठेवून ‘पिप’ तंत्रज्ञानाद्वारे छायाचित्रे घेतली. या ‘तिन्ही प्रकारच्या मूर्तींतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होेतो ?’, हे या छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर समजले.
१ अ. चाचणीतील ‘पिप’ छायाचित्रांच्या प्रभावळीतील सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने दर्शवणारे रंग अन् त्यांचे प्रमाण
टीप १ – घटकाच्या अंतर्बाह्य स्तरांवरील नकारात्मक स्पंदने अल्प किंवा नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता
टीप २ – घटकाच्या केवळ बाह्य स्तरांवरील नकारात्मक स्पंदने अल्प किंवा नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता
टीप ३ – ‘पिप’ संगणकीय प्रणालीच्या निर्मात्यांनी ‘पिप’ छायाचित्रात निर्धारित केलेल्या रंगांमध्ये स्पंदने एकत्रित दर्शवणार्या रंगांची माहिती नसल्यामुळे आम्ही ही स्पंदने ‘तटस्थ’ धरली आहेत.
२. निरीक्षणांचे विवरण
२ अ. मूलभूत नोंद – सनातन आश्रमातील सात्त्विक वातावरणामुळे सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अधिक दिसणे : कलियुगातील सर्वसाधारण वास्तूमधून सकारात्मक स्पंदनांपेक्षा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे प्रमाण अधिक असते. ही चाचणी अत्यंत सात्त्विक अशा ‘सनातन आश्रमा’त केलेली असल्याने ‘मूलभूत नोंदी’च्या वेळीही (चाचणीसाठी श्री गणेशमूर्ती पटलावर ठेवण्यापूर्वीच्या) प्रभावळीत सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण नकारात्मक स्पंदनांपेक्षा अधिक आहे.
२ आ. कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीमुळे वातावरणातील नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण मूलभूत स्पंदनांच्या तुलनेत पुष्कळ वाढणे : मूलभूत नोंदीतील ३४ टक्के नकारात्मक स्पंदनांच्या तुलनेत या मूर्तीमधून ६१ टक्के नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत आहेत. पटलावर कागदी लगद्यापासून बनवलेली मूर्ती ठेवल्यानंतर मूलभूत नोंदीच्या तुलनेत वातावरणातील नकारात्मक स्पंदने दर्शवणार्या रंगांपैकी भगवा रंग दिसत नाही; परंतु नारिंगी रंग ५ पटींनी वाढला आणि गुलाबी रंग पुष्कळ प्रमाणात दिसू लागला. याउलट वातावरणातील सकारात्मक स्पंदने दर्शवणार्या रंगांपैकी पिवळा, गडद हिरवा आणि निळा, हे रंग दिसत नाहीत.
२ इ. मातीच्या सर्वसाधारण श्री गणेशमूर्तीमुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अत्यल्प वाढणे : मूलभूत नोंदीतील ६६ टक्के सकारात्मक स्पंदनांच्या तुलनेत या मूर्तीमधून ६८ टक्के सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत आहेत. पटलावर मातीची सर्वसाधारण मूर्ती ठेवल्यानंतर मूलभूत नोंदीच्या तुलनेत वातावरणातील नकारात्मक स्पंदने दर्शवणार्या रंगांपैकी भगवा रंग दिसत नाही; परंतु नारिंगी रंग ४ पटींनी वाढला आहे. याउलट वातावरणातील सकारात्मक स्पंदने दर्शवणार्या रंगांपैकी पिवळा रंग दिसत नाही. गडद हिरवा निम्मा झाला आहे, तर हिरवा आणि निळा हे रंग पुष्कळ वाढले आहेत. सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक उपायक्षमता दर्शवणारा पोपटी रंग थोड्या प्रमाणात दिसत आहे.
२ ई. सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत श्री गणेशमूर्तीमुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढणे : मूलभूत नोंदीतील ६६ टक्के सकारात्मक स्पंदनांच्या तुलनेत या मूर्तीमधून ८४ टक्के सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत आहेत. पटलावर सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत श्री गणेशमूर्ती ठेवल्यानंतर मूलभूत नोंदीच्या तुलनेत वातावरणातील नकारात्मक स्पंदने दर्शवणार्या रंगांपैकी भगवा रंग दिसत नाही; परंतु नारिंगी रंग दुप्पट झाला आहे. याउलट वातावरणातील सकारात्मक स्पंदने दर्शवणार्या रंगांपैकी पिवळा रंग दिसत नाही, गडद हिरवा थोडा वाढला आहे, तर हिरवा आणि निळा हे रंग पुष्कळ वाढले आहेत. सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक उपायक्षमता दर्शवणारा पोपटी रंग थोड्या प्रमाणात दिसू लागला आहे.
३. निरीक्षणांमागील अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. कागदी लगद्यापासून बनवलेली श्री गणेशमूर्ती उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक असणे : ही मूर्ती कागदाचा लगदा या असात्त्विक आणि अशास्त्रीय घटकापासून बनवलेली आहे. देवतेची मूर्ती अध्यात्मशास्त्रानुसार बनवली नसली, तर काय दुष्परिणाम होऊ शकतो, याचे हे एक उदाहरण आहे. यावरून प्लास्टिक, बाटल्या आदी असात्त्विक घटकांंपासून बनवलेली किंवा विडंबनात्मक मूर्ती यांतून किती मोठ्या प्रमाणात नकारात्मक स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होत असतील, याची कल्पना येऊ शकते. त्यामुळे अशी मूर्ती उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक ठरणार आहे.
३ आ. सर्वसाधारण मातीची श्री गणेशमूर्ती उपासकाला थोडी लाभदायी असणे : ही मूर्ती मातीपासून बनली असल्याने आणि गणपतीच्या सर्वसाधारण आकृतीबंधानुसार असल्याने त्यातून मूलभूत नोंदीच्या तुलनेत थोडी अधिक सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत आहेत. ही मूर्ती उपासकाला थोडी लाभदायी असते.
३ इ. सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत श्री गणेशमूर्ती उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ लाभदायी असणे
३ इ १. ‘सनातन-निर्मित श्री गणपतीची मूर्ती’ हे धर्मशास्त्रात दिलेल्या गणपतीच्या रूपाच्या वर्णनानुसार, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काळानुसार केलेल्या मार्गदर्शनानुसार असणे : ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती नेहमी एकत्रित असते’, असा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्यामुळे देवतेचे रूप आले की, त्याची शक्ती तेथे असतेच. प्रत्येक देवतेच्या रूपाचे वर्णन द्रष्ट्या ऋषिमुनींनी धर्मशास्त्रात लिहून ठेवलेले आहे. त्यामुळे मूर्तीकाराने स्वतःच्या कल्पनेने बनवलेल्या मूर्तीपेक्षा धर्मशास्त्रात दिलेल्या वर्णनानुसार असलेल्या मूर्तीत त्या त्या देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात असते. धर्मशास्त्रात एकाच देवतेची अनेक नावे आणि त्यानुरूप असणार्या रूपांचा उल्लेख आढळतो. अशा वेळी उपासकांनी काळानुसार देवतेच्या कोणत्या रूपाची उपासना करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी आहे, ते केवळ अध्यात्मातील जाणकार, म्हणजे संतच सांगू शकतात. सनातन-निर्मित श्री गणपतीची मूर्ती हे धर्मशास्त्रात दिलेल्या गणपतीच्या रूपाचे वर्णन आणि काळानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन यांनुसार बनवलेली आहे. या मूर्तीतून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने अशा मूर्तीची पूजा आणि उपासना करणे उपासकाच्या दृष्टीने लाभदायक आहे !
४. निष्कर्ष
गणेशपूजकाला कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक तर नाहीच, उलट अत्यंत हानीकारक आहे. सर्वसाधारण मातीची गणेशमूर्ती आध्यात्मिकदृष्ट्या अल्प प्रमाणात लाभदायक आहे आणि सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्ती पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे.
गणेशपूजकांनो, कागदी गणेशमूर्ती, अन्य अशास्त्रीय घटकांपासून बनवलेली, तसेच अशास्त्रीय आकारांत बनवलेली गणेशमूर्ती कदापि वापरू नका. शक्य असल्यास शास्त्रीय गणेशमूर्ती वापरून गणेशपूजनाचा पूर्ण लाभ घ्या. अशी मूर्ती उपलब्ध नसल्यास निदान शाडूच्या मातीची पारंपरिक गणेशमूर्ती पूजनाकरता वापरा.’
– आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (५.८.२०१७)
ई-मेल : mav.research2014@gmail.com
सूचना १: ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ छायाचित्र क्र. २, ३ आणि ४ यांची तुलना मूळच्या प्रभावळीशी करतांना चाचणीसाठी ठेवलेली श्री गणेशमूर्ती, तसेच पटल यांवरील रंग येथे ग्राह्य धरलेले नाहीत.
सूचना २ : ‘पिप’ छायाचित्रात पोपटी किंवा पांढरा (चंदेरी) हे उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक असलेले रंग दिसू लागल्यास काही वेळा पिवळा, गडद हिरवा किंवा हिरवा या सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांच्या दर्शक रंगांचे प्रमाण घटते किंवा ते रंग पूर्णपणे दिसेनासे होतात. हा चांगला पालट समजला जातो; कारण त्या वेळी सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांची जागा त्यापेक्षाही उच्च प्रतीच्या सकारात्मक स्पंदनांनी घेतलेली असते. |
या लेखातील ‘पिप’ तंत्रज्ञानाची ओळख, चाचणी संबंधाने घेतलेली दक्षता ही नेहमीची सूत्रे जागेअभावी प्रसिद्ध केली नाहीत; पण ती www.SanatanPrabhat.Org संकेतस्थळावरील लेखात दिली आहे. – संपादक |
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |