अमरावतीत पावसामुळे मातीच्या मूर्तींची हानी !
(हे छायाचित्र प्रसिद्ध करण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
अमरावती – शहरात ७ सप्टेंबर या दिवशी पहाटे कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे येथील व्यापारी संकुलात पाणी शिरले आहे. यामुळे दुकानात असणार्या शाडू मातीच्या श्री गणेशमूर्ती पाण्यात विरघळल्या असून मूर्तीकारांची अनुमाने दीड लाख रुपयांची हानी झाली आहे. मूर्तीकर नीलेश कांचनपूरे यांनी शाडू मातीच्या ४५० श्री गणेशमूर्ती दस्तुरनगर चौक येथील एका व्यापारी संकुलात विक्रीसाठी आणल्या होत्या, तर २५० मूर्ती भूमीवरच प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवण्यात आल्या होत्या. मुसळधार पावसामुळे व्यापारी संकुलात पाणी शिरले. त्यामुळे भूमीवर ठेवलेल्या २५० श्री गणेशमूर्ती पाण्यात विरघळल्या आहेत.