पुणे येथील ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट’चे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते होणार श्रींची प्राणप्रतिष्ठापना !
पुणे, ९ सप्टेंबर – ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’च्या वतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षानिमित्त १० सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजता ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. वेदमूर्ती नटराज शास्त्री आणि वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली हा सोहळा मंदिरामध्ये संपन्न होईल. श्रींचे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्थाही ट्रस्टने केली आहे, तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
ऋषिपंचमीनिमित्त ११ सप्टेंबर या दिवशी अथर्वशीर्ष पठण सोहळा, तसेच १० ते १९ सप्टेंबर दरम्यान प्रतिदिन धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आणि उत्सवकाळात श्रींची आरती ऑनलाईन पद्धतीने भाविकांना अनुभवता येणार आहे.