परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘समाजाला देवतांच्या सात्त्विक मूर्तींचा लाभ व्हावा’, याची असलेली तळमळ !
साधकांना श्री गणेशमूर्तीतून अधिकाधिक गणेशतत्त्व मिळावे’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधक-कलाकारांकडून प्रथम धूम्रवर्णाची श्री गणपतीची मूर्ती बनवून घेतली. त्यानंतर साधक कलाकारांनी श्री गणेशाच्या सात्त्विक मूर्ती बनवल्या. ‘सात्त्विक मूर्ती कशी असावी ?’, हे कळण्यासाठी सनातनच्या प्रत्येक केंद्रात आणि आश्रमात धूम्रवर्णाच्या श्री गणेशाच्या मूर्ती पाठवल्या, तसेच सनातनच्या ग्रंथ-प्रदर्शनावर सर्वांना दर्शनासाठी ठेवल्या. यामागे परात्पर गुरुदेवांचा
उद्देश होता की, ज्यांना अशा सात्त्विक मूर्ती बनवून हव्या असतील, त्यांनी समाजातील मूर्तीकारांकडून बनवून घ्याव्यात. त्यासाठी सनातन-निर्मित ‘श्री गणपति’ या ग्रंथात सात्त्विक मूर्तीची छायाचित्रे आणि मापे दिली आहेत. एकदा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘पूर्वी सात्त्विक लोक होते. त्यांना या मूर्तींचा लाभ होत होता. आपण श्री गणेशमूर्तीत अधिकाधिक गणेशतत्त्व येण्यासाठी प्रयत्नरत आहोत. देवळात अशा मूर्ती ठेवल्यास समाजातील लोकांना देवत्वाचा लाभ होणार आहे. त्या दृष्टीने दुर्गादेवीची मूर्ती सिद्ध करणे चालू आहे.’’
आम्हा साधकांची क्षमता नसतांनाही गुरुदेव आमची सिद्धता करून घेत आहेत. ‘समाजाला हे ज्ञात व्हावे’, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेनेच मी हे लिहू शकलो’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. राजेंद्र सांभारे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
(१७.९.२०२०)