मुसलमानांना धर्माच्या नव्हे, तर अल्पसंख्यांक म्हणून राजकारणात प्रतिनिधित्व द्या ! – केंद्रीय मंत्री रामदास आठवले
आजन्म कोणत्या ना कोणत्या माध्यमांतून केवळ आरक्षणाचीच मागणी करत रहाणारे असे नेते देशाच्या उन्नतीमधील सर्वांत मोठे अडथळे आहेत. अशांना जनतेने निवडणुकीत धडा शिकवूनही त्यांना मिळणारे राजकीय महत्त्व भारतियांना लज्जास्पद ! – संपादक
मथुरा (उत्तरप्रदेश) – मुसलमानांना धार्मिक आधारावर नव्हे, तर अल्पसंख्यांक समुदाय म्हणून राजकीय प्रतिनिधित्व दिले पाहिजे, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. एम्.आय.एम्.चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी काही दिवसांपूर्वी अशीच मागणी केली होती. आठवले यांनी त्याचेच समर्थन केले.