श्री गणेशचतुर्थीसाठी राज्यशासन नवीन नियमावली प्रसिद्ध करणार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
पणजी, ८ सप्टेंबर (वार्ता.) – राज्यशासन श्री गणेशचतुर्थीसाठी नवीन नियमावली प्रसिद्ध करणार नाही; मात्र नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी आवश्यक काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
गोवा शासनाने ७ सप्टेंबर या दिवशी श्री गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली होती. यामध्ये पूजेसाठी पुरोहितांना कुणाच्याच घरी जाता येणार नाही, तर पूजा ‘ऑनलाईन’ किंवा ‘यूट्यूब’ आदींच्या माध्यमातून करावी, असे आवाहन करण्यात आले होते. या नियमाला समाजातून तीव्र विरोध झाल्यानंतर सरकारने ही मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध झाल्यावर अवघ्या काही घंट्यांतच मागे घेतली. यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यशासन नवीन नियमावली प्रसिद्ध करणार नसल्याचे म्हटले आहे.