नगर येथे ४ सहस्र गोवंशियांची कातडी जप्त
३ धर्मांध कह्यात
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असूनही मोठ्या प्रमाणात गायी, बैल आणि वासरे यांची हत्या होणे दुर्दैवी आहे ! कायदा आणि पोलीस प्रशासन यांवरील सामान्य माणसाचा विश्वास उडवणार्या या गोहत्या बंद होण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक
नगर, ८ सप्टेंबर – येथील श्रीरामपूर शहरातील विभाग क्रमांक २ मध्ये धाड टाकून अनुमाने ४ सहस्र गोवंशियांची कातडी पोलिसांनी जप्त केली आहे. तेथून चांद पठाण, बबलू कुरेशी आणि हाजी मुस्ताक यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून १६ लाख ५ सहस्र रुपयांची ही कातडी आणि आयशर टेम्पो जप्त करण्यात आला. या आरोपींनी प्रक्रिया करून ही कातडी गोदामात साठवून ठेवली होती आणि विक्रीसाठी नेण्याचा प्रयत्न चालू होता. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या भागात अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांकडून अल्प किमतीत जनावरे विकत घेतली जातात. गोवंशियांची हत्या करून मांस, तसेच इतर प्रत्येक अवयवाचे वेगळे पैसे दिले जातात. त्यातीलच कातडी हा एक भाग आहे. विविध वस्तू सिद्ध करण्यासाठी या कातडीला मोठी मागणी आहे. हा अवैध व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणात चालतो, असे लक्षात येत आहे.