५३ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. ओजस्वी तळेकर (वय ३ वर्षे)
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. ओजस्वी तळेकर एक आहे !
दादर, मुंबई येथील चि. ओजस्वी तळेकर (वय ३ वर्षे) हिच्या जन्मापूर्वी तिच्या आईला जाणवलेली सूत्रे आणि जन्मानंतर बाळाची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. जन्मापूर्वी
१ अ. गोव्याला जाऊन रामनाथी आश्रम पहाण्याचा विचार येणे आणि त्याच्या दुसर्या दिवशी गरोदर असल्याचे कळणे : ‘एकदा रात्री मी यजमानांना म्हणाले, ‘‘मला गोव्याला फिरायला जायचे आहे.’’ त्या वेळी मनामध्ये होते की, गोव्याला जाऊ, तेव्हा रामनाथी येथील सनातनच्या आश्रमालाही भेट देता येईल. त्याच्या दुसर्या दिवशी मला ‘मी गरोदर आहे’, हे समजले.
१ आ. गरोदर आहे, हे समजण्यापूर्वीच ‘श्रीमान योगी’ या पुस्तकाच्या वाचनास आरंभ होणे : आमच्या घरी आधीपासूनच ‘श्रीमान योगी’ हे पुस्तक होते आणि मला ते वाचायचे होते; पण माझ्याकडून ते पुस्तक वाचणे झालेच नाही. मी गरोदर आहे, हे समजण्यापूर्वीच माझ्याकडून ‘श्रीमान योगी’ या पुस्तकाच्या वाचनास आरंभ झाला होता.
१ इ. गरोदरपणात तलवार चालवण्याची इच्छा हिंदु एकता दिंडीत सहभागी झाल्यावर पूर्ण होणे : गरोदरपणात मला तलवार चालवायची पुष्कळ इच्छा व्हायची. अकस्मात् मला सनातनच्या ‘हिंदू एकता दिंडी’मध्ये सहभागी होण्याची संधी मिळून तलवार पकडायला मिळाली होती. त्या वेळेला मला आतून पुष्कळ चांगले वाटत होते. जणू काही हे सर्व मला वाटत नसून देव माझ्या गर्भातील बाळाच्या इच्छा पूर्ण करून घेत आहे, असे जाणवले.
२. गुणवैशिष्ट्ये
२ अ. हसरे आणि आकर्षक व्यक्तीमत्त्व : ओजस्वीचे डोळे बोलके आहेत आणि तोंडवळा हसरा आहे. तिचे वागणे हळुवार आणि बोलणे मृदू आहे. ओजस्वी लहानपणापासूनच सर्वांना आकर्षून घेते.
२ आ. समंजसपणा आणि परिस्थितीशी जुळवून घेणे : ओजस्वी अनावश्यक चिडचिड करत नाही किंवा त्रासही देत नाही. एवढ्या लहान वयातही ती समंजसपणे वागते. ती जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीशी लगेच जुळवून घेते. मी आणि माझे यजमान कार्यालयात जातो, तेव्हा ती तिच्या आजी-आजोबांच्या समवेत छान रहाते. ती अनावश्यक हट्ट करत नाही.
२ इ. आज्ञाधारकपणा : ती आज्ञाधारक आहे. ती कोणतीही गोष्ट विचारून करते. ती नेहमी खरे बोलते.
२ ई. सात्त्विकता : ओजस्वीला सात्त्विक आहार आवडतो. तिला फळे खायला पुष्कळ आवडतात. तिला कापूर लावायला आणि त्याचा वास घ्यायला पुष्कळ आवडते.
२ उ. देवतांशी बोलणे : ती १० मासांची असतांना तिला एका साधिकेकडे गौरीच्या दर्शनासाठी घेऊन गेले होते. तेव्हा ‘ती गौरीशी बराच वेळ बोबड्या भाषेत काहीतरी बोलत आहे, गौरीला काहीतरी सांगत आहे’, असे जाणवले.
२ ऊ. वीर वृत्ती : ओजस्वीला ऐतिहासिक चित्रपटातील शौर्याची गाणी आवडतात.
२ ए. प्राण्यांविषयी सहानुभूती असणे : दूरदर्शनवरील कार्यक्रम बघत असतांना कुणी प्राण्यांना मारले, तर ती रडायला लागते. तिला प्राण्यांच्या समवेत खेळायला आवडते.’
– सौ. शैला तळेकर (ओजस्वीची आई), दादर, मुंबई. (७.५.२०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता |