चीन आणि तालिबान यांचे संंबंध फारसे चांगले नसल्याने ते काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत ! – जो बायडेन
वॉशिंग्टन (अमेरिका) – चीन आणि तालिबान यांचे संंबंध फारसे चांगले नाहीत. त्यामुळेच ते तालिबानसमवेत सहकार्य करून या गोंधळातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. रशिया, इराण आणि पाकिस्तान यांचाही असाच प्रयत्न आहे. ‘आता आपण नक्की तालिबानशी कसे वागावे ?’ यासंदर्भात हे सर्व देश चाचपडतांना दिसत आहेत, असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केले आहे. ‘तालिबान आणि चीन यांची वाढती जवळीक, तसेच चीनकडून तालिबानला आर्थिक साहाय्य दिले जाईल, हा चिंतेचा विषय आहे का ?’ या प्रश्नावर उत्तर देतांना बायडेन यांनी हे मत व्यक्त केले.
Joe Biden was asked about the China-Taliban finance link. Here’s what he said https://t.co/P8lsTKQD1n
— Hindustan Times (@HindustanTimes) September 8, 2021