देशात आणि देशाबाहेर हिंसा हीच पाकची संस्कृती आहे ! – भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला सुनावले
पाक एक कोडगा देश असल्याने त्याला शब्दांचे कितीही फटके दिले, तरी त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही ! त्याला कायमचे नष्ट करणेच योग्य ! – संपादक
न्यूयॉर्क (अमेरिका) – पाकने स्वतःच्या घरात आणि घराबाहेरही हिंसाचाराची संस्कृती चालू ठेवली आहे; कारण त्याने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपिठाचा वापर भारताच्या विरोधात द्वेषयुक्त भाषण करण्यासाठी केला आहे. आम्ही अशा सर्व प्रयत्नांना नाकारतो आणि त्याचा निषेध करतो, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानला सुनावले आहे. संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी प्रतिनिधी विदिशा मैत्रा एका उच्चस्तरीय बैठकीच्या वेळी बोलत होत्या. संयुक्त राष्ट्रांतील पाकचे राजदूत मुनीर अक्रम यांनी जम्मू-काश्मीरचे सूत्र उपस्थित केले होते. तसेच जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनावरून पाकने भारताविरोधात विधाने केली. त्यावर भारताने प्रत्युत्तर दिले.
Slamming #Pakistan at the UN India said the country continues to foment a culture of violence at home and across its borders https://t.co/7P58vDdaM1
— Zee News English (@ZeeNewsEnglish) September 8, 2021