श्री गणेशमूर्तींच्या भावात २० ते २५ टक्के वाढ होऊनही पर्यावरणपूरक शाडू मातीच्याच मूर्तींना पुणेकरांची पसंती !
पुणे, ७ सप्टेंबर – पर्यावरण संवर्धन, तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरच्या घरीच विसर्जन करता येतील अशा शाडू, तसेच लाल मातीच्या श्री गणेशमूर्तींच्या खरेदीस भाविक पसंती देत आहेत. नैसर्गिक रंगांच्या विविध चित्ताकर्षक मूर्तींच्या भावात २० ते २५ टक्के वाढ होऊनही शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींनाच पुणेकर प्राधान्य देत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना मागील वर्षीच्या तुलनेत अल्प मागणी आहे. पर्यावरणपूरक शाडू, तसेच लाल मातीच्या मूर्तींची अनुमाने ६० टक्के नोंदणी झाल्याचे काही स्टॉलधारकांकडून सांगण्यात येत आहे.