आध्यात्मिकतेचा वारसा असेपर्यंत जगातील कोणत्याही शक्तीला भारताचा विनाश करणे अशक्य !
‘भारताचा आत्मा म्हणजे धर्म आहे. आध्यात्मिकता आहे म्हणूनच भारताचे पुनरुत्थानसुद्धा धर्माद्वारेच होईल. भारताचे प्राण धर्मातच सामावले आहेत. हिंदु लोक जोपर्यंत आपल्या पूर्वजांचा महान वारसा विसरत नाहीत, तोपर्यंत या जगातील कोणतीही शक्ती त्यांचा विनाश करू शकत नाही. जोपर्यंत शरिरातील रक्त शुद्ध आणि शक्तीसंपन्न आहे, तोपर्यंत त्या देहात कुठल्याही रोगाचे जंतू जिवंत राहू शकत नाहीत. आपले जीवनरक्त म्हणजे आध्यात्मिकता होय. जर ते आपल्या अंगातून स्पष्टपणे, शुद्ध आणि बलसंपन्न असे वहात असेल, तर सर्वकाही सुरळीत होईल. जर ते रक्त शुद्ध असेल, तर राजकीय, सामाजिक आणि अन्य भौतिक दोष अगदी या भूमीची गरिबीसुद्धा सर्व काही सुधारले जाईल.’
– श्री. राजाभाऊ जोशी (साभार : मासिक लोकजागर, दिवाळी विशेषांक २००८)