कुडाळ शहरात सापडल्या सव्वा ५ लाख रुपयांच्या बनावट नोटा
कुडाळ – शहरातील मारुति मंदिराजवळ असलेल्या भाजीबाजारात ७ सप्टेंबरला सकाळी सापडलेल्या २ पिशव्यांमध्ये ५ लाख २५ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कुडाळ पोलीस निरीक्षक फुलचंद मेगडे यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली आणि रक्कम कह्यात घेतली. त्यानंतर शहरातील सर्व ‘ए.टी.एम्. सेंटर’ची पहाणी केली; मात्र सर्व सेंटर सुरक्षित असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले. या नोटांची पोलिसांनी शहरातील बँक ऑफ बडोदाच्या शाखाधिकांर्याकडून निश्चिती केली असता त्या नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. (बनावट नोटा हे देशाची अर्थव्यवस्था पोखरण्याचे माध्यम आहे. बहुतांश वेळा शत्रूराष्ट्र बनावट नोटांचे माध्यम वापरत असते. त्यामुळे या बनावट नोटा ठेवणार्यांचा शोध घेऊन त्याची पाळेमुळे खणणे आवश्यक आहे ! – संपादक)