विश्व हिंदु परिषद पूर्वच्या वतीने जावेद अख्तर यांच्या छायाचित्राला जोडे मारा आंदोलन !
कोणत्याही गोष्टीची निश्चिती न करता बोलणारे हिंदुद्रोही जावेद अख्तर देशासाठी घातक आहेत. हिंदु संत, देव, देश आणि धर्म यांवर टीका होत असतांना आवाज न उठवणारेही देशासाठी धोकादायकच आहेत, हे लक्षात घ्यायला हवे.
पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांची तुलना जावेद अख्तर यांनी तालिबान्यांशी केली होती. त्यामुळे विश्व हिंदू परिषद पूर्वच्या वतीने जावेद अख्तर यांच्या छायाचित्राला जोडे मारा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला विश्व हिंदु परिषदेचे इतर सहकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. या तीनही संघटनांची ‘राष्ट्र प्रथम’ ही विचारधारा आहे, तसेच त्यांनी समाजासाठी वेळोवेळी कार्यही केले आहे, हे अख्तर यांना दिसत नाही का ? जे घराबाहेर पडले नाहीत, त्यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे आहे, असे विश्व हिंदु परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत विशेष संपर्क प्रमुख किशोर चव्हाण यांनी सांगितले.