लातूरमध्ये दोन पाझर तलाव फुटले !
लातूर – जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यामध्ये मागील दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला. जोरदार पावसामुळे या भागातील सर्वच नदी नाले आणि ओढे यांमध्ये पाणी वाढले आहे. या भागातील अनेक पाझर तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. अहमदपूर तालुक्यातील चिखली या गावाच्या शिवारात दोन पाझर तलाव आहेत. पाण्याचा प्रचंड वेग आणि सततचा पाऊस यांमुळे हे दोन पाझर तलाव फुटून तलावातील सर्व पाणी वाहून गेले.