धर्मांतरबंदी करण्यासाठी केंद्रीय स्तरावर कायदा करण्यासह हवाला आणि काळा पैसा यांवर प्रतिबंध आवश्यक ! – अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय, वरिष्ठ अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय
सनातन धर्माच्या विरोधातील कार्य, तसेच भारताच्या विरोधातील कोणतेही कार्य विनामूल्य होत नाही. यामध्ये ‘रोख रक्कम, हवाला आणि काळे धन’, या ३ प्रकारच्या माध्यमांतून हे धर्मांतर होते. भारतात जे ‘जिहाद’ चालू आहेत, त्यातच ‘धर्मांतर जिहाद’ हाही एक जिहाद आहे. भारतात धर्मांतरासाठी विदेशातून ‘हवाला’ आणि ‘काळे धन’ यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा येत आहे. केवळ मिशनरी-धर्मांधांनाच नव्हे; तर नक्षलवादी, माओवादी, फुटिरतावादी, आतंकवादी या सर्वांना हवालाच्या माध्यमातून पैसा सर्वत्र पोचवला जातो. त्यामुळे देशाला सर्वांत मोठा धोका ‘हवाला’ आणि ‘काळे धन’ यांमुळे निर्माण झाला आहे. धर्मांतरावर खर्या अर्थाने बंदी आणायची असेल, तर ‘हवाला’ आणि ‘काळे धन’ यांवर प्रतिबंध आणण्यासह धर्मांतराच्या विरोधात कठोरतम कलम भारतीय दंड संहितेमध्ये वाढवावे. त्यात १० ते २० वर्षे कारावास अन् संपत्ती जप्तीचा अंतर्भाव असावा. हिंदु धर्मातील जगद्गुरूंनीही काळानुसार ‘धर्मांतरविरोधी कायद्या’ची मागणी करणे आवश्यक आहे.