पुणे येथे १४ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस !
आरोपींना पोलीस कोठडी समवेत लवकरात लवकर कठोर शिक्षाच होणे अपेक्षित आहे. – संपादक
पुणे – १४ वर्षाच्या मुलीला पुणे रेल्वे स्थानकावरून घरी सोडण्याचे खोटे आमीष दाखवून तिला शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्थानक आणि खडकी परिसरातील ‘लॉज’वर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना कह्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध चालू आहे. न्यायालयाने आरोपींना १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.