जावेद अख्तर यांचे संघाविषयीचे वक्तव्य घृणास्पद, त्यांनी संघ समजून घ्यावा ! – डॉ. कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
संघ तालिबानी असता, तर जावेद अख्तर यांना संघावर टीका करण्याचे धैर्य तरी झाले असते का ? – संपादक
नेवासे (नगर), ७ सप्टेंबर – जावेद अख्तर यांचे संघाविषयीचे वक्तव्य घृणास्पद आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबान्यांशी केली. त्यांचा मी निषेध करतो. संघातील प्रत्येक जण राष्ट्रीय हितासाठी, राष्ट्रभक्तीसाठी आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी काम करतो. अख्तर यांनी संघ समजून घेण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिला. डॉ. कराड यांनी ५ सप्टेंबर या दिवशी श्रीक्षेत्र देवगड येथे श्री दत्त संस्थानला भेट दिली. त्या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर डॉ. कराड बोलत होते. या वेळी मंत्री डॉ. कराड यांनी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांचे दर्शन घेऊन त्यांचा सत्कार केला.