‘कोरोना’ महामारीपासून रक्षण होण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपाविषयी ईश्वराने करवून घेतलेले चिंतन !
‘श्रीकृष्णाची परम भक्ती आणि सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरुदेवांची संकल्पशक्ती यांद्वारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘कोरोना’च्या महामारीतून साधकांचे संरक्षण व्हावे’ आणि साधकांची प्रतिकारक्षमता वाढावी, यासाठी नामजपादी उपाय म्हणून ‘श्री दुर्गादेव्यै नमः।’ हा जप तीन वेळा, त्यानंतर ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा जप एकदा, पुन्हा ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा जप तीन वेळा आणि शेवटी ‘ॐ नमः शिवाय ।’ हा जप एकदा, असा जप सिद्ध केला आहे. या जपाची अनुभूती साधक घेत आहेत.
या जपाविषयी माझ्याकडून झालेले चिंतन पुढे देत आहे, ‘एका जपामध्ये जेव्हा वीसहून अधिक अक्षरे येतात, तेव्हा त्याला ‘माला जप’, असे म्हणतात. या जपाच्या तीन देवता आहेत. दुर्गादेवी, दत्त आणि शिव. प्रत्येक देवतेचा जप सात अक्षरी आहे. एका जपाचे एक आवर्तन पूर्ण झाल्यानंतर तो मंत्र छपन्न अक्षरी इतका मोठा होतो. या जपाचे वैशिष्ट्य असे आहे की, प्रत्येक जप सात अक्षरांचा असल्याने जणूकाही संगीतातील सप्तसूर एकत्रित आल्याप्रमाणे या जपाला एक विशिष्ट ‘ताल’ आणि ‘लय’ प्राप्त झाली आहे. त्यामुळे हा जप म्हणत असतांना मनाची एकाग्रता साधली जाते. एवढा मोठा जप असूनही तो करतांना माझ्याकडून सहसा चुकत नाही किंवा मागे-पुढेही होत नाही.’
गुरुदेवांनी हे चिंतन मजकडून करवून घेतल्याविषयी मी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांनीच करवून घेतलेले चिंतन त्यांच्या चरणांवर अत्यंत शरणागतभावात राहून समर्पित करतो.’
– श्री. संजय घाटगे, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर.
(१७.५.२०२१)