सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या सूक्ष्मातील जाणण्याच्या अफाट सामर्थ्याची साधिकेला आलेली प्रचीती !
१. पू. माईणकर आजींसाठी दिलेल्या गोळ्या दोन दिवस शोधूनही न सापडणे
‘२३.४.२०२१ या दिवशी पू. माईणकर आजींसाठी दिलेल्या एक मासाच्या औषधाच्या गोळ्या माझ्याकडून हरवल्या. ‘मी त्या गोळ्या कुठे ठेवल्या ?’, हे मला आठवत नव्हते. मी आणि २ साधिका दोन दिवस त्या गोळ्या शोधत होतो. एका साधिकेने मला हरवलेली वस्तू सापडण्यासाठीचा मंत्र दिला. मी तो मंत्र ३० मिनिटे म्हटला; परंतु त्या गोळ्या सापडत नव्हत्या.
२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी सूक्ष्मातून जाणून एका सेकंदात ‘गोळ्या कुठे असतील ?’, ते सांगणे आणि त्यांनी सांगितलेल्या ठिकाणीच गोळ्या सापडणे
एका साधिकेने मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना याविषयी सांगायला सांगितले. मी सद्गुरु गाडगीळकाकांना लघुसंदेश पाठवला. सद्गुरु गाडगीळकाकांनी लघुसंदेश वाचल्यावर मला संपर्क करून सांगितले, ‘‘गुलाबी, ‘ज्या खणात गोळ्या ठेवल्या आहेत’, असे तुला वाटते, त्याच खणाच्या खाली व्यवस्थित बघ. ‘गोळ्या तेथेच आहेत’, असे मला दिसत आहे.’’ मी खण पूर्ण उघडल्यावर मला दिसले, ‘‘गोळ्या खाली पडलेल्या आहेत.’’ खरेतर मी आणि अन्य साधिकांनी तो खण अनेक वेळा उघडून पाहिला होता; परंतु गोळ्या खाली पडल्याचे आमच्या कुणाच्याच लक्षात आले नाही. सद्गुरु गाडगीळकाकांनी एका सेकंदात गोळ्या शोधून दिल्या. यामुळे मला सद्गुरु गाडगीळकाकांच्या सूक्ष्मातील जाणण्याच्या अफाट सामर्थ्याची प्रचीती आली.
परात्पर गुरुदेवांनी असे उच्च कोटीचे संत आम्हा साधकांना दिले. त्यासाठी आम्ही सदैव कृतज्ञ आहोत.’
– कु. गुलाबी धुरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(२४.४.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |