प्रेमभावाचे मूर्तीमंत रूप असलेले सनातनचे ऋषितुल्य सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !
१. प्रेमभाव
‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यात पुष्कळ प्रेमभाव आहे. त्यांच्याकडून प्रेमभावाची स्पंदने लगेच आपल्याकडे येतात आणि त्यांच्याशी सहजतेने बोलता येते.
२. प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञाच्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हातात चांदीचा त्रिशूळ दिसून ‘त्यांच्यासमोर देवी सिंहासनावर बसली आहे’, असे दिसणे
रामनाथी आश्रमात झालेल्या प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञाच्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यज्ञात आहुती देत होते. तेव्हा मला ‘त्यांच्या हातात चांदीचा त्रिशूळ आहे’ आणि ‘त्यांच्यासमोर देवी सिंहासनावर बसली आहे’, असे दिसले. त्यामुळे मी २ – ३ वेळा डोळ्यांवरचा चष्मा काढून डोळे पुसून नीट पाहिले, तरी मला तेच दृश्य दिसत होते.
दुसर्या दिवशी मी सद्गुरु गाडगीळकाकांना नामजपादी उपाय विचारायला गेले होते. तेव्हा मी त्यांना विचारले, ‘‘काल तुम्ही यज्ञाच्या वेळी हातात त्रिशूळ घेऊन बसला होता का ?’’ ते ‘नाही’ म्हणाले. नंतर मी त्यांना विचारले, ‘‘तुमच्यासमोर देवी सिंहासनावर बसली होती का ?’’ तेव्हाही ते ‘नाही’ म्हणाले.
तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मला दिसलेले दृश्य म्हणजे मला आलेली आध्यात्मिक अनुभूती होती.’
३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ सद्गुरुपदी विराजमान होण्याच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ हे सद्गुरुपदी विराजमान होण्याच्या एक मास आधीपासून ‘पू. गाडगीळकाका आता ‘सद्गुरु’ होणार’, असे मला जाणवत होते. नंतर एक मासाने ते ‘सद्गुरु’पदी विराजमान झाल्याचे समजल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली. (सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ ३१.५.२०२० या दिवशी सद्गुरुपदी विराजमान झाले.)
– श्रीमती कमल गरुड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(२०.१०.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |