पंजशीरमधील तालिबान्यांच्या ठिकाणांवर अज्ञात लढाऊ विमानांद्वारे आक्रमण
नवी देहली – तालिबानने अफगाणिस्तानमधील पंजशीर प्रांत जिंकल्याचा दावा केला असला, तरी अद्याप तेथे युद्ध चालू असल्याचे वृत्त आहे. काही लढाऊ विमानांनी पंजशीरमध्ये तालिबानच्या स्थानांवर आक्रमण केले आहे. ही विमाने कोणत्या देशाची आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. पंजशीरच्या ‘रेझिस्टंस फोर्स’चा प्रमुख अहमद मसूद याने प्रसारमाध्यमांना पाठवलेल्या ऑडिओ संदेशामध्ये अफगाणिस्तानच्या लोकांना, ‘तुम्ही देशाच्या आत असाल किंवा देशाबाहेर, मी तुम्हाला अफगाणिस्तानच्या सन्मान, स्वातंत्र्य आणि समृद्धी यांसाठी राष्ट्रीय बंड पुकारण्याचे आवाहन करतो’, असे सांगितले. अहमद मसूद कझाकिस्तानला पळून गेला असल्याचे सांगितले जात आहे.
Many people are still hoping to leave the country, but with Kabul’s airport not yet running international flights, their choices are few#Panjshir #Airstrike #Afghanistanhttps://t.co/hqs1KvP8J0
— India TV (@indiatvnews) September 7, 2021