वस्तू आणि सेवा कर भरण्याच्या संदर्भातील माहिती देण्यासाठी श्रीकृष्ण-अर्जुन संवादाचा विडंबनात्मक वापर !
दैनिक ‘लोकमत’कडून भगवान श्रीकृष्णाचे विडंबन
इतर धर्मातील श्रद्धास्थानांचे अशा प्रकारे विडंबन केले असते, तर एव्हाना त्यांनी कायदा हातात घेऊन संबंधितांना जाब विचारला असता; मात्र हिंदू धर्माभिमानशून्य असल्यामुळे हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे पुनःपुन्हा विडंबन केले जाते. हे रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करणे आवश्यक आहे ! – संपादक
मुंबई, ६ सप्टेंबर (वार्ता.) – दैनिक ‘लोकमत’च्या ‘ऑनलाईन’ आवृत्तीमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तात सप्टेंबर मासात वस्तू आणि सेवा कर परतावा (जी.एस्.टी. रिटर्न) भरतांना करदात्याने कोणत्या गोष्टींचे पालन करावे, यासंदर्भात सनदी लेखापाल (सीए) उमेश शर्मा यांनी माहिती दिली आहे. या माहितीला भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादाचे रूप देऊन भगवान श्रीकृष्णाचे विडंबन करण्यात आले आहे.
जीएसटी रिटर्न भरण्यापूर्वी ही काळजी घ्या… https://t.co/OCwJ66Ejb1
— Lokmat (@MiLOKMAT) September 6, 2021
या बातमीमध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारतो, ‘हे कृष्णा, जी.एस्.टी.च्या अंतर्गत सप्टेंबर मासाचा परतावा (रिटर्न) भरण्यापूर्वी करदात्यांनी कोणती काळजी घ्यावी ?’ त्यावर श्रीकृष्ण अर्जुनाला उद्देशून करदात्याने कर भरतांना कोणत्या गोष्टींचे पालन करावे, हे सांगितले आहे. अशा प्रकारे व्यावहारिक गोष्टींसाठी हिंदूंच्या देवतांचे आणि हिंदूंना आदरणीय असलेल्या अर्जुनाचे विडंबन केल्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.
वरील संवाद प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक