भाजपच्या राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियानाचा नवी मुंबई येथे प्रारंभ !
नवी मुंबई – भाजपच्या राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियानाचा नवी मुंबईत प्रारंभ करण्यात आला आहे. कोपरखैरणे येथे याची जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. भाजप वैद्यकीय आघाडी आणि आयटी सेल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. कोरोना विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी, तसेच आरोग्य क्षेत्रात स्वावलंबन आणि जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हे अभियान हाती घेण्यात आले आहे. यामध्ये स्वयंसेवक सिद्ध करण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले होते.