पुणे येथे श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने आयोजित ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजप सत्संगाला धर्मप्रेमींचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
पुणे – ‘हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे’, या उद्देशाने पुणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्ग घेतले जातात. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने धर्मशिक्षणवर्गात सहभागी होणार्या धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजप सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्संगाला हिंदु धर्मप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सत्संगाच्या आरंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद कालगांवकार यांनी श्रीकृष्ण जयंतीचे महत्त्व सांगितले, तसेच सर्वांकडून सामूहिक प्रार्थना करवून घेतली. यानंतर समितीच्या सौ. गौरी येवले यांनी उपस्थित धर्मप्रेमींकडून भावजागृतीचा प्रयोग करवून घेतला. नंतर सर्वांनी सामूहिक ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा नामजप केला. या सत्संगाचा २६० हून अधिक धर्मप्रेमी आणि त्यांच्या कुटुंबियांनी लाभ घेतला.
क्षणचित्र
या वेळी उपस्थित अनेक धर्मप्रेमींनी ‘नामजपामुळे भावजागृती झाली, तसेच आनंद मिळाला आणि साक्षात् श्रीकृष्णाचे दर्शन झाले’, असे सांगितले.