पुण्याजवळील घाट माथ्याला ‘ऑरेंज अलर्ट’ !
पुणे – शहर आणि परिसरातील घाट भागात पुढील ३ दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे ७ ते ९ सप्टेंबरपर्यंत घाट भागात ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. बोपदेव घाट परिसर आणि कोंढवा येथे ५ सप्टेंबर या दिवशी मुसळधार पाऊस पडला.