झारखंडमध्ये ख्रिस्ती धर्मप्रचारकांकडून धर्मांतरासाठी हिंदु महिलेचा छळ !
ख्रिस्त्यांकडून महिलेच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण !
राज्यात झारखंड मुक्ती मोर्चाचे ख्रिस्तीधार्जिणे सरकार असतांना वेगळे काय होणार ? कायद्याचे भय न राहिलेल्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांना रोखण्यासाठी आता केंद्र सरकारनेच पावले उचलणे आवश्यक ! – संपादक
रांची (झारखंड) – गुमला जिल्ह्यातील जामडीह येथे ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी धर्मांतरासाठी एका हिंदु महिलेचा प्रचंड छळ केला आणि तिच्या अल्पवयीन मुलीचेही लैंगिक शोषण केले. याप्रकरणी पीडितेने त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.
Jharkhand: Dalit woman files complaint against Christian villagers alleging torture to forcefully convert her family, harassment of minor daughterhttps://t.co/NX2kgdNpwx
— OpIndia.com (@OpIndia_com) September 5, 2021
पीडित महिला आरोग्य सेविका आहे. तिने सांगितले, ‘ख्रिस्ती धर्मप्रचारक माझ्या घरी आले आणि त्यांनी मला ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यास सांगितला. यावर मी त्यांना ‘आम्ही हिंदु धर्मांत आनंदी आहोत’, असे उत्तर दिले आणि धर्मांतर करण्यास नकार दिला. त्यामुळे ख्रिस्ती धर्मप्रचारक चिडले. त्यांनी माझ्या १६ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले आणि सांगितले, ‘आम्ही तिच्याशी लग्न करू तिला ख्रिस्ती बनवू.’
याप्रकरणी पीडितेने पॉलीना बिलुंग, आकाश डुंगडुंग, निशा, शीला, फूलमनी सुरीन, उर्मिला, संतोषी, जानकी, शीतल राम, गंगीदेवी आणि सुशीलादेवी यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. हे सर्व जण धर्मांतरित ख्रिस्ती आहेत. (धर्मांतरित ख्रिस्ती त्यांची हिंदु नावे पालटत नाहीत. हिंदूंची दिशाभूल करून त्यांचे धर्मांतर करण्यासाठी ते असे करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) कुरकुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत. गुमला धर्मांतराचे केंद्र बनले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दळणवळणबंदीच्या काळात ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी येथे मोठ्या प्रमाणात लोकांचे धर्मांतर केले आहे.