मुसलमानाने इस्लामवर टीका केली, तर त्याला ‘धर्मनिरपेक्षतावादी’ ऐवजी ‘हिंदुत्वनिष्ठ’ म्हटले जाईल ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन
नवी देहली – भारतात जर तुम्ही मुसलमान पालकांच्या पोटी जन्माला येऊनही इस्लामवर टीका करत असाल, तर लोक तुम्हाला ‘हिंदुत्वनिष्ठ’ म्हणतील. तुम्ही प्रत्यक्षात काय आहात, याविषयी ते काही म्हणणार नाहीत. तुम्ही ‘सुधारक’ किंवा इस्लामी समाजाला ‘धर्मनिरपेक्ष’ करण्याचा प्रयत्न करणारे ‘धर्मनिरपेक्षतावादी’ आहात’, असे ते कधीच म्हणणार नाहीत, असे ट्वीट करून बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी मुसलमानांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
In India, if you are critical of islam even though you were born to Muslim parents, people would say ‘you are an extreme right wing hindutva vadi’. They won’t call you what you are actually, ‘a reformer’ or ‘a secularist trying to secularize Islamic society’.
— taslima nasreen (@taslimanasreen) September 6, 2021