सैन्याधिकाऱ्यांना गीता आणि कौटिल्य अर्थशास्त्र शिकवा !
‘कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट’कडून केंद्र सरकारकडे शिफारस !
अभिनंदनीय शिफारस ! केवळ हे दोन ग्रंथच नव्हे, तर हिंदूंचे असे अनेक धर्मग्रंथ सैन्याधिकारी आणि सैनिक यांना शिकवणे आवश्यक आहे. त्यातून त्यांचे मनोबल वाढण्यासह नेतृत्व गुण वाढण्यास साहाय्य होईल ! – संपादक
नवी देहली – ‘कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट’कडून करण्यात आलेल्या एका अभ्यासातून श्रीमद्भगवद्गीता आणि कौटिल्य अर्थशास्त्र यांसारख्या प्राचीन ग्रंथांचा सैन्य प्रशिक्षणामध्ये समावेश करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. या संदर्भात अधिक संशोधन केले जाऊ शकते. त्यासाठी ‘भारतीय संस्कृती अभ्यास मंच’ही स्थापन केला जाऊ शकतो, असेही या अभ्यासात म्हटले आहे. सिकंदराबाद (तेलंगाणा) येथे ‘कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट’चे सैन्य प्रशिक्षण केंद्र आहे. येथे सैन्याच्या तीनही दलांच्या वरिष्ठ अधिकार्यांना प्रशिक्षण दिले जाते. या केंद्राकडून ‘प्राचीन भारतीय संस्कृती आणि युद्धतंत्र यांचे गुण अन् वर्तमानातील संरक्षण आणि प्रशिक्षण’ या संदर्भात प्रकल्प राबवण्यात येत आहे. याद्वारे भारतीय प्राचीन ग्रंथांचा शोध घेऊन त्या ग्रंथांद्वारे संरक्षणाच्या दृष्टीने नेतृत्व गुण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Defence study recommends including Arthashastra, Gita in Army curriculum, Congress opposes saying Muslims also fought Kargil warhttps://t.co/Pr18vWRCO4
— OpIndia.com (@OpIndia_com) September 3, 2021
(म्हणे) ‘सैन्याचे राजकीयकरण करण्याचा प्रयत्न !’ – काँग्रेस
कारगिलचे युद्ध मुसलमान सैनिकांच्या साहाय्याने जिंकल्याचाही दावा
|
काँग्रेसने या शिफारसीचा विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते के.के. मिश्रा यांनी म्हटले की, श्रीमद्भगवद्गीता आणि अर्थशास्त्र शिकवणे, हे सैन्यदलांचे राजकीयकरण करण्यासारखे आहे. कमीतकमी सैन्याच्या संदर्भात तरी राजकारण करू नये. आम्ही मुसलमान सैनिकांच्या साहाय्याने कारगिल युद्ध जिंकले होते.