देवगड-जामसंडे नगरपंचायत क्षेत्रात विनाअनुमती फलक लावणार्यांवर कारवाई होणार
देवगड – देवगड-जामसंडे शहरात लावण्यात येणार्या फलकांविषयी नगरपंचायतीने कडक भूमिका घेतली आहे. अनुमतीविना फलक लावण्यास मनाई करण्यात आली असून नेमून दिलेल्या कालावधीत फलक न हटवल्यास फलक कह्यात घेण्याचा निर्णय नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या सभेत घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी दिली. देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या क्षेत्रात अनुमतीविना काही फलक लावण्यात आले आहेत. अनुमतीविना फलक लावले जातात, तसेच अनुमती घेऊन लावलेले फलक ठरलेल्या कालवधीत संबंधितांकडून काढले जात नाहीत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. हे थांबवण्यासाठी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत नियमावली करण्यात आल्याचे नगराध्यक्षा साळसकर यांनी सांगितले.