महाराष्ट्र शासनाच्या विधेयकांविषयी सूचना पाठवण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – संसदेने केंद्रशासनाच्या जीवनावश्यक वस्तू (सुधारणा अधिनियम) २०२० या अधिनियमाला संमती दिली आहे. या अधिनियमाच्या संबंधी राज्यशासनाच्या अत्यावश्यक वस्तू (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०२१ या विधेयकाचा मसुदा लोकांचे अभिप्राय मागवण्यासाठी महाराष्ट्र विधान मंडळाच्या www.mis.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
वर्ष २०२१ चे विधानसभा विधेयक क्रमांक अनुक्रमे १७, १८ आणि १९ म्हणजे (शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) आश्वासित मूल्य आणि कृषी सेवा करार (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, शेतकरी उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (प्रचालन आणि सुलभीकरण) (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक आणि अत्यावश्यक वस्तू (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, या विधेयकांविषयी ज्या व्यक्ती सुधारणा, सूचना पाठवू इच्छितात, त्यांनी त्यांच्या सूचना आणि सुधारणा ३ प्रतींमध्ये निवेदनाच्या स्वरूपात राजेंद्र भागवत, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई – ४०००३२ या पत्त्यावर किंवा al.assembly.mls@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.