सांगली आणि कोल्हापूर येथील स्थानिक केबल वाहिनीवर गणेशोत्सवाच्या निमित्ताने विशेष सत्संग मालिकेचे प्रक्षेपण !
सनातन संस्थेच्या वतीने सिद्ध करण्यात आलेल्या २१ भागांच्या या मालिकेत श्री गणेशचतुर्थी आणि श्री गणेश उपासना, गणेश चतुर्थीच्या काळात येणारी महत्त्वाची व्रते, डाव्या आणि उजव्या सोंडेच्या गणपतीच्या उपासनेचे महत्त्व, नवीन मूर्तीचे प्रयोजन आणि व्रत, श्री गणेशमूर्ती घरी आणणे, गणेशपूजनात वापरण्यात येणार्या जास्वंदीच्या फुलांचे महत्त्व, श्री गणेशपूजनात मोदकाचे महत्त्व इत्यादी माहिती असेल.
सांगली – ‘सांगली मिडिया कम्युनिकेशन’च्या (‘सी न्यूज’च्या) भक्ती वाहिनीच्या १०९ क्रमांकाच्या वाहिनीवर ५ ते ८ सप्टेंबर या कालावधीत सायंकाळी ५ वाजता प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
कोल्हापूर – ‘बी’ न्यूजच्या भक्ती वाहिनीच्या ५३१ क्रमांकाच्या वाहिनीवर ७ ते ११ सप्टेंबर या कालावधीत रात्री ७ वाजता प्रक्षेपित करण्यात येणार आहे.