कवी प्रदीप यांची मुलाखत पाहिल्यावर साधिकेची झालेली विचारप्रक्रिया
१. ‘मी माझ्या भ्रमणभाषवर कवी प्रदीप यांची ३ मिनिटांची वरील मुलाखत पाहिली आणि मला माझीच लाज वाटली. खरंच काय मिळाले हिंदूंना ? १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, तर सोडाच; पण नंतर गेल्या ७४ वर्षांत तरी काय मिळाले ? उलट काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांनी ‘या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचाच आहे’, असेच उघडपणे सांगितले आणि आम्ही ते निमूटपणे ऐकूनही घेतले.
२. ‘१५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्यदिन ! या दिवशी भारतमाता इंग्रजांच्या गुलामगिरीच्या बेड्यातून मुक्त झाली. चाचा नेहरू, आपल्या स्वतंत्र देशाचे पहिले आणि लाडके पंतप्रधान !’, या आणि अशाच अनेक गुंगीच्या गोळ्या खातखातच आम्ही लहानाचे मोठे झालो. आम्हाला खोटा इतिहास शिकवला गेला. परिणामी आमचा बुद्धीभ्रम झाला. असे पुढच्या पिढ्यांचे तरी होऊ नये; म्हणून आम्ही सतर्क आणि सावध होऊन आमचा खरा अन् पराक्रमी हिंदूंचा इतिहास अभ्यासला पाहिजे.
३. यातून देवाने एक महत्त्वाचे सूत्र शिकवले ते म्हणजे प्रत्येक घटनेचा विशेषतः आपल्या समष्टीच्या अंतर्गत देव, देश आणि धर्म यांविषयी तिच्याकडे सर्वांगाने बघण्याचा, योग्य-अयोग्य समजून घेण्याचा, दूरदृष्टीने अभ्यास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे करता येण्यासाठी अर्थात्च समर्थ रामदासस्वामींची शिकवण आचरणात आणली पाहिजे.
सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ।।
– दासबोध, दशक २०, समास ४, ओवी २६
अर्थ : प्रत्येकामध्ये फार मोठी चळवळ करण्याचे सामर्थ्य असते. काही जण त्या दृष्टीने प्रयत्न करतातही; परंतु ते प्रयत्न यशस्वी होण्यासाठी त्या प्रयत्नांना भगवंताचे अधिष्ठान असणे अत्यंत आवश्यक आहे.
३. कवी प्रदीप यांच्या घेतलेल्या या मुलाखतीत (चित्रफितीत) ते वयोवृद्ध दिसत आहेत. त्यांचा मृत्यू ११.१२.१९९८ या दिवशी झाला; पण आतापर्यंत ही मुलाखत मुख्य प्रसारमाध्यमांत कधी दिसल्याचे आठवत नाही. ती आता सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. काँग्रेसच्या काळात सत्याला वाचा फोडणारी आणि हिंदूंना जागृत करणारी ही मुलाखत दडपली होती का ? ही आताच प्रसिद्ध होण्याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२१ या दिवशी ‘१४ ऑगस्ट हा ‘फाळणीच्या वेदनेचा स्मृतीदिन’ म्हणून घोषित केले !’
४. कवी प्रदीप यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच नाही, तर आपल्या स्वातंत्र्याचा हा लाजिरवाणा इतिहास पालटण्यासाठी आतातरी आपण संघटित होऊन कटीबद्ध होऊया आणि शीघ्रातीशीघ्र हिंदु राष्ट्राची स्थापना करूया !
– श्रीगुरुचरणी शरणागत, श्रीमती कमलिनी कुंडले, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.८.२०२१)