‘डेसीबल मीटर’ नादुरुस्त झाल्याने ध्वनीप्रदूषण करणार्या ‘रेव्ह पार्ट्यां’वर कारवाई करू शकत नाही’, असे म्हणणारे पोलीस असणे, हे लज्जास्पद !
‘डेसीबल मीटर’ (ध्वनीची मर्यादा तपासण्याचे उपकरण) नादुरुस्त झाल्याने हणजुणे (गोवा) पोलीस ध्वनीप्रदूषण करणार्या ‘रेव्ह पार्ट्यां’वर कारवाई करू शकत नाहीत, अशी माहिती पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला दिली. ‘हणजुणे-वागातोर समुद्रकिनारपट्टीवर रात्रीपासून दुसर्या दिवशी सकाळपर्यंत रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांमध्ये होत असलेल्या ध्वनीप्रदूषणावर कोणतेच नियंत्रण नसते’, अशा आशयाची जनहित याचिका गोवा खंडपिठात प्रविष्ट करण्यात आली आहे. (यातून पोलीस खाते एकतर निष्क्रीय आहे किंवा पोलीस अधिकार्यांचे रेव्ह पार्ट्या करणार्यांशी साटेलोटे आहे, असे वाटल्यास चुकीचे
काय ? ‘डेसीबल मीटर’ नादुरुस्त हे कळूनही तो नवीन का घेतला नाही ? न्यायालयाने यावर कठोर निर्णय घ्यायला हवा ! – संपादक)’