‘भारताने एकाही अफगाणी मुसलमानाला शरणार्थी म्हणून स्वीकारू नये’, हे एका मानवाधिकार कार्यकर्त्याला समजते, ते भारत सरकारला का कळत नाही ?
‘भारताने एकाही अफगाणी मुसलमानाला शरणार्थी म्हणून स्वीकारू नये. भारत अफगाणिस्तानातील अल्पसंख्य हिंदू आणि शीख यांना शरण देत आहे, हे कौतुकास्पद आहे. तुर्कस्तान, इराण, पाकिस्तान, बांगलादेश, मलेशिया यांसारखी मुसलमानांच्या हितांसाठी लढणारी अनेक ‘ठेकेदार’ राष्ट्रे आहेत. त्यांनीच खरेतर अफगाणी लोकांना स्वीकारायला हवे, असे स्पष्ट मत पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांच्या हितांसाठी लढणारे लंडन येथील मानवाधिकार कार्यकर्ते आरिफ अजाकिया यांनी व्यक्त केले.’