गोव्यात २४ घंट्यांत ५ कोरोनाबाधितांचे निधन, तर ७२ नवीन रुग्ण
पणजी, ५ सप्टेंबर (वार्ता.) – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचे निधन होण्याचे प्रमाण ५ सप्टेंबर या दिवशी अचानक वाढले. ५ सप्टेंबर या दिवशी कोरोनाबाधित ५ रुग्णांचे निधन झाले आणि यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग झाल्याने निधन झालेल्यांची एकूण संख्या ३ सहस्र २०८ झाली आहे. ५ सप्टेंबर या दिवशी राज्यात कोरोनाबाधित ७२ नवीन रुग्ण आढळले, तर कोरोनाविषयक चाचणीच्या तुलनेत रुग्ण सापडण्याचे प्रमाण १.३ टक्के झाले आहे. ५ सप्टेंबर या दिवशी कोरोनाबाधित ८९ रुग्ण कोरोनापासून बरे झाले. राज्यात कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालयात भरती होण्याची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. ५ सप्टेंबर या दिवशी कोरोनाबाधित २२ रुग्णांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले.