अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच तरुणी स्नानगृहातच बेशुद्ध !
दूरचित्रवाणीवरील मालिका आणि चित्रपट यांत काम करणार्या कलाकारांना आदर्श न मानता वास्तव जीवनाचे भान ठेवा ! – संपादक
मुंबई – अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांच्या निधनाचे वृत्त ऐकून त्यांच्या एका चाहतीला गंभीर धक्का बसला असून ती बेशुद्ध पडली. तिच्यावर अतीदक्षता विभागात उपचार चालू आहेत. आधुनिक वैद्य जयेश ठकेर यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.
जयेश ठकेर यांनी पुढे म्हटले आहे की, सिद्धार्थच्या मृत्यूचे वृत्त ऐकून त्यांची एक चाहती स्नानगृहातच बेशुद्ध पडली होती. चाहत्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. कुटुंबीय आणि मित्र यांच्याशी बोला. एकटे राहू नका. अधिक ताण घेतल्यामुळे माणूस अंशत: बेशुद्ध होऊ शकतो. सर्व चाहत्यांनी शांत व्हायला हवे. झालेल्या घटनेचा अधिक विचार करणे थांबवावे. मन विचलित होऊ देऊ नये.