विद्यार्थ्यांसमवेत गैरवर्तणूक करणार्या प्राध्यापकांना ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या कार्यकर्त्यांनी काळे फासले !
आटपाडी (जिल्हा सांगली), ५ सप्टेंबर – येथील एका महाविद्यालयातील प्राध्यापक विकास बोडरे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमवेत गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न केला होता. बोडरे यांनी ‘रॅगिंग’, लैंगिक शोषण अशा प्रकारचे कृत्य केल्याची तक्रार विद्यार्थी परिषदेकडे आली होती. या संदर्भात सखोल माहिती घेऊन विद्यार्थ्यांसमवेत गैरवर्तणूक करणारे प्राध्यापक विकास बोडरे यांना ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या कार्यकर्त्यांनी काळे फासले.
प्राध्यापक विकास बोडरे यांना पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांकडून प्रश्न विचारण्यात आले असता सर्व विद्यार्थ्यांसमोर विकास बोडरे यांनी चुकीची स्वीकृती दिली. यानंतर ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या वतीने महाविद्यालय बंद करून प्राचार्यांना निवेदन देऊन बोडरे यांच्या निलंबनाची मागणी प्राचार्यांकडे करण्यात आली. या वेळी जिल्हा सहसंयोजक विशाल जोशी, बाहुबली छत्रे, विश्वजीत भोसले, अवधूत नलवडे आणि पीडित विद्यार्थ्यांचे पालक हे उपस्थित होते.