‘यू ट्यूब’ वाहिनीच्या दिग्दर्शकाला मुंबईत अटक
५० लाखांचा गांजा कह्यात !
मुंबई – मुंबई पोलिसांनी गौतम दत्ता (वय ४३ वर्षे) या ‘यू ट्यूब’ वाहिनीच्या दिग्दर्शकाला अटक केली आहे. त्याच्याकडे १ किलो गांजा सापडला असून त्याचे मूल्य ५० लाख रुपये आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी (अमली पदार्थ विरोधी पथक) दत्ता नलवडे यांनी दिली आहे. गौतम दत्ता याचा हिंदी चित्रपसृष्टीशी संबंध असून तो अनेकांना अमली पदार्थ पुरवत असल्याचा संशय असल्याचे एका अधिकार्याने सांगितले. (हिंदी चित्रपसृष्टीचे वास्तव जाणा ! – संपादक)