श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बालसंस्कार’ संकेतस्थळावरून घेण्यात येत आहे ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा !
मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषिक जिज्ञासूंचा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई – श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसह युवा पिढीला श्री गणेशाविषयी धर्मशास्त्र माहीत व्हावे, यासाठी श्री गणेशाविषयीचे २५ प्रश्न असलेली विशेष ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बालसंस्कार’ या संकेतस्थळावरून घेण्यात येत आहे. ही प्रश्नमंजुषा मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये उपलब्ध असून त्या त्या भाषांतील जिज्ञासूंकडून ती सोडवण्यात येत आहे. कोणत्याही शुभकार्याला आरंभ करण्यापूर्वी प्रथम श्री गणेशाचे पूजन केले जाते. यावरूनच श्री गणेशाचे माहात्म्य आपल्या लक्षात येते. सध्याच्या युवा पिढीला श्री गणेशाविषयीचे धर्मशास्त्र लक्षात यावे, यांसाठी ही प्रश्नमंजुषा उपयुक्त ठरत आहे. ही प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
या ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषेमध्ये ‘श्री गणेशाच्या ध्वजावर कोणते चिन्ह आहे ?’, ‘गणपति नादभाषेचे रूपांतर कोणत्या भाषेत करतो ?’, ‘गणपति किती विद्यांचा अधिपती आहे ?’, ‘श्री गणेश अथर्वशीर्ष कुणी लिहिले ?’, ‘गणपतीच्या पूजनात दुर्वा किती संख्येने वहाव्यात ?’, असे विविध प्रश्न विचारले आहेत. ‘प्रश्नमंजुषा सोडवल्याने श्री गणेशाविषयी धर्मशास्त्रीय माहिती मिळत आहे’, अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली जात आहे.
प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी लिंक
१. मराठी – Balsanskar.com/marathi/quiz-ganesh-chaturthi
२. हिंदी – Balsanskar.com/hindi/quiz-ganesh-chaturthi
३. इंग्रजी – Balsanskar.com/quiz-ganesh-chaturthi
४. कन्नड – Balsanskar.com/kannada/quiz-ganesh-chaturthi