पुणे येथे ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव’ साजरा होणार !

पुणे, ४ सप्टेंबर – कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यावर राज्यशासनाने निर्बंध घातले असल्याने ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत होणार्‍या या महोत्सवात कीर्तन, काव्य, चित्रपट संगीत, महाराष्ट्रातील कला, शास्त्रीय संगीत असे विविध कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘स्वरभास्कर’ हा विशेष कार्यक्रम महोत्सवात सादर होणार आहे.