निधर्मीवादी, साम्यवादी आणि शहरी नक्षलवादी यांच्या हिंदुद्वेषी अभद्र युतीचा वैध मार्गाने विरोध करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

१० ते १२ सप्टेंबर या कालावधीत हिंदुद्वेष्ट्यांकडून आयोजित ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या विषयावर जागतिक ऑनलाईन परिषद

श्री. चेतन राजहंस

दिल्ली – ख्रिस्ती आणि जिहादी साम्राज्यवादी शक्तींना वैश्‍विक हिंदुत्वाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी भारतातील राजकीय विचारांचे निधर्मीवादी, साम्यवादी आणि शहरी नक्षलवादी यांच्या साहाय्याने १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत  ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या विषयावर जागतिक पातळीवर ऑनलाईन परिषद आयोजित केली आहे. निधर्मीवादी, साम्यवादी आणि शहरी नक्षलवादी यांच्या अभद्र युतीचा विरोध करण्यासाठी भारतातील हिंदु संघटना, धर्मप्रेमी हिंदु यांनी स्वक्षमतेनुसार निषेध करून धर्मकर्तव्य बजावले पाहिजे, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाला सनातन संस्था वैध मागार्र्ने विरोध करत आहे.

या पार्श्‍वभूमीवर श्री. राजहंस म्हणाले की,
१. सध्या अफगाणिस्तानातील तालिबान्यांच्या आतंकवादी कारवायांची चर्चा जगभर चालू आहे. याचे मूळ हे ११ सप्टेंबर २००१ या दिवशी अमेरिकेत तालिबान्यांनी केलेल्या आतंकवादी आक्रमणामध्ये आहे. त्याला २० वर्षे पूर्ण होणार आहेत. तालिबान्यांचा आतंकवाद पुन्हा अफगाणिस्तानात चालू झाला आहे. अशा वेळी येत्या ११ सप्टेंबर या दिवशी पुन्हा तालिबानी आतंकवादावर चर्चा होईल. ती होऊ नये आणि ‘हिंदु आतंकवाद’ असा विषय चर्चेला यावा याकरता हेतूपुरस्सर हिंदुत्वाला लक्ष्य करण्यात आले आहे.
२. ११ सप्टेंबर हा दिवस अमेरिका आणि हिंदू यांसाठी महत्त्वाची आहे. याच दिवशी हिंदु धर्माचे तेजस्वी धर्मप्रचारक स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील धर्मसभेत ओजस्वी भाषण करून हिंदुत्वाची गुढी वैश्‍विक स्तरावर उभारली होती. ‘हा इतिहास पुसला जावा’, हाही आयोजकांचा हेतू आहे.

कार्यक्रमात सहभागी होणार्‍या हिंदुद्वेषी आणि भारतविरोधी वक्त्यांची सूची  

१. औद्रे ट्रशके : ‘स्टुडंट अगेन्स्ट हिंदुत्व आयडॉलॉजी’ संघटनेच्या सल्लागार समितीच्या सदस्या, तसेच अमेरिकेतील सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी.
२. क्रिस्टोफे जाफ्रीलोट  : साम्यवादी विचारसरणीचे स्तंभलेखक
३. बानू सुब्रह्मण्यम् : अमेरिकेतील मँचेस्टर विद्यापीठातील प्राध्यापक
४. आनंद पटवर्धन : भारतातील साम्यवादी विचारसरणीचे स्वयंघोषित मानवाधिकार कार्यकर्ते तथा लघुपट निर्माते
५. आयेशा किडवाई : साम्यवादी विचारांच्या कार्यकर्त्या, तथा जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या प्राध्यापिका
६. भंवर मेघवंशी : पत्रकार आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता
७. कविता कृष्णन् : भारतातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो (पक्षाच्या उच्चाधिकार समितीच्या) सदस्या
८. मीना खंडासमी : आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्या
९. नंदिनी सुंदर : दिल्ली स्कुल ऑफ इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापिका, तसेच हिंदुद्वेषी ‘द वायर’ संकेतस्थळाचे संपादक सिद्धार्थ वरदराजन यांची पत्नी
१०. नेहा दीक्षित : हिंदुद्वेषी ‘द वायर’च्या पत्रकार