‘व्हिडिओ गेम्स’ खेळल्यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर हानीकारक परिणाम होतो !

नावीन्यपूर्ण आध्यात्मिक संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेले महत्त्वपूर्ण संशोधन

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

‘व्हिडिओ गेम्स’चे घातक परिणाम पहाता त्यावर बंदीच हवी !

 

डॉ. (सौ.) नंदिनी सामंत

९ नोव्हेंबर २०१० या दिवशी ‘कॉल ऑफ ड्यूटी : ब्लॅक ऑप्स्’ (Call of Duty: Black Ops) (टीप १) हा ‘व्हिडिओ गेम’ बाजारात आला. पुढील एका मासात हा खेळ ६० कोटीपेक्षा अधिक घंटे (म्हणजे ६८ सहस्र वर्षांपेक्षा अधिक काळ) खेळण्यात आला !

टीप १ – ‘कॉल ऑफ ड्यूटी : ब्लॅक ऑप्स्’ हा एक प्रथम व्यक्ती नेमबाज (फर्स्ट पर्सन शूटर) ‘व्हिडिओ गेम’ आहे. हा गेम खेळणारी व्यक्ती खेळातील नायक अमेरिकेच्या केंद्रीय गुप्तचर संस्थेचा (‘सीआयए’चा) अलेक्स मेसन हा (काल्पनिक) हेर करत असलेल्या विविध नेमबाजीच्या कारवाया स्वतः करत असल्याप्रमाणे अनुभव करते.

व्हिडिओ गेम्स संदर्भातील उपरोल्लेखित आकडेवारीतून पुढील दोन सूत्रे स्पष्ट होतात.

१. व्हिडिओ गेम्स आता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेले आहेत.

२. याचा आपल्या जीवनावर प्रचंड प्रभाव आहे.

या माध्यमावर एवढा वेळ देणे समाजाला परवडण्यासारखे आहे का ? ‘या माध्यमाचा आपल्यावर सूक्ष्म (टीप २) स्तरावर काय परिणाम होतो’, हे आधुनिक वैज्ञानिक उपकरण आणि सूक्ष्म परीक्षण यांच्या माध्यमातून जाणण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निष्कर्ष संक्षिप्त रूपाने येथे देत आहोत.

टीप २ – जे ‘पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे आहे’, ते म्हणजे सूक्ष्म.

१. व्हिडिओ गेम्स खेळण्याचे लाभ आणि तोटे

व्हिडिओ गेम्स खेळण्यामुळे हात आणि डोळे यांतील समन्वय (hand-eye co-ordination), समस्या सोडवण्याचे कौशल्य (problem-solving skills), माहितीवर सुयोग्य प्रक्रिया करण्याची मनाची क्षमता (mind’s ability to process information) यांत वाढ होते, असे काही सर्वेक्षणांतून लक्षात आले आहे. अर्थात् उत्तरोत्तर या खेळात गुंतून राहिल्याने एकाग्रता न्यून (कमी) होणे, शालेय कामगिरीत घट होणे यांसारख्या तोट्यांबरोबर या खेळाच्या अतिरेकाचे रूपांतर त्याच्या व्यसनामध्ये होते.

२. व्हिडिओ गेम्सच्या सूक्ष्म स्तरावरील परिणामांचा आधुनिक वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून केलेला अभ्यास

यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) या आधुनिक वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून संशोधन करण्यात आले.

२ अ. प्रयोगाची मांडणी

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या आध्यात्मिक संशोधन केंद्रात रहाणारे ५ साधक या चाचणीत सहभागी झाले होते. चाचणीला आरंभ करण्यापूर्वी त्यांच्या ‘यू.ए.एस्.’ ने नोंदी करण्यात आल्या. या नोंदी त्यांची ‘मूलभूत स्थिती’ (बेसलाईन रिडिंग) दर्शवतात. त्यानंतर प्रत्येक साधकाला एक प्रथम व्यक्ती नेमबाज (फर्स्ट पर्सन शूटर) व्हिडिओ गेम १ घंटा खेळायला सांगण्यात आले. त्यानंतर त्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाने मोजणी करण्यात आली. या नोंदी ‘गेम खेळण्याचा साधकावर झालेल्या परिणामाच्या दर्शक’ होत. या चाचणीतील मोजण्यांच्या नोंदी पुढील सारणीत दिल्या आहेत.

वरील सारणीतून केवळ १ घंटा ‘व्हिडिओ गेम’ खेळल्यामुळे झालेले पुढील हानीकारक परिणाम स्पष्ट होतात.

१. साधक क्र. १ मध्ये चाचणीपूर्वी असलेल्या नकारात्मक ऊर्जेत वाढ झाली, तर साधक क्र. ३ आणि ५ यांच्यामध्ये आधी नसलेली नकारात्मक ऊर्जा खेळल्यानंतर निर्माण झाली.

२. साधक क्र. ४ मध्ये खेळण्यापूर्वी असलेली सकारात्मक ऊर्जा खेळल्यानंतर नष्ट झाली.

२ आ. व्हिडिओ गेम्स खेळण्याचा मुलांवर सूक्ष्म स्तरावर होणार्‍या परिणामाचा केलेला अभ्यास : यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या आध्यात्मिक संशोधन केंद्रात रहाणार्‍या १० ते १२ या वयोगटातील २ बालसाधकांना लहान मुलांमध्ये प्रसिद्ध असणारे ‘सुपर मारिओ रन’ (Super Mario Run) आणि ‘मिनी-मिलिशिया’ (Mini-militia) हे व्हिडिओ गेम खेळायला सांगण्यात आले. या चाचणीतील मोजण्यांच्या नोंदी पुढील सारणीत

वरील सारणीतून व्हिडिओ गेम्स खेळण्याचे पुढील हानीकारक परिणाम लक्षात येतात.

१. बालसाधक क्र. १ मध्ये चाचणीपूर्वी नसलेली नकारात्मक ऊर्जा व्हिडिओ गेम खेळल्यानंतर निर्माण झाली, तर बालसाधक क्र. २ मध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा खेळल्यानंतर वाढली.

२. बालसाधक क्र. १ मध्ये चाचणीपूर्वी असलेली सकारात्मक ऊर्जा खेळल्यानंतर नष्ट झाली.

२ इ. व्हिडिओ गेम्स खेळण्याच्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठीच्या चाचणीच्या वेळी साधकांना आलेले अनुभव

१. खेळतांना तणाव जाणवणे

२. अधीरतेमध्ये वाढ होणे

३. आक्रमकतेत वाढ होणे

४. डोक्यात बधीरता जाणवणे

५. आळस जाणवणे

६. ईश्वराच्या संदर्भातील विचार किंवा साधनविषयीचे विचार यांपासून दूर होणे

व्हिडिओ गेम खेळतांना साधकांना जे जाणवले त्यावरूनही हे गेम्स खेळण्याच्या हानीकारक परिणामांची व्याप्ती लक्षात येते.

२ ई. व्हिडिओ गेम्स खेळण्याच्या परिणामाचा सूक्ष्म परीक्षणाच्या माध्यमातून केलेला अभ्यास : एखाद्या घटनेचा सूक्ष्म स्तरावर होणारा परिणाम खर्‍या अर्थाने केवळ सूक्ष्म परीक्षणातून जाणता येतो. व्हिडिओ गेम्स खेळतांना सूक्ष्म स्तरावर नेमकी काय प्रक्रिया होते, ते ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे (टीप ३) युरोप येथील संत पू. देयान ग्लेश्चिश यांना सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानातून स्पष्ट होते.

टीप ३ – ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ (एस्.एस्.आर्.एफ्.) ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने स्थापित आणि ऑस्ट्रेलिया, युरोप आणि अमेरिका येथे नोंदणीकृत अशासकीय संस्था (एन्.जी.ओ.) आहे.

१. व्हिडिओ गेममधून त्रासदायक, मायावी आणि आकर्षण शक्ती वातावरणात अन् खेळणार्‍या व्यक्तीकडे प्रक्षेपित होते. मायावी शक्ती ही खरे तर त्रासदायक शक्तीपेक्षाही अधिक हानीकारक असते. याचे कारण ‘त्रासदायक शक्ती निदान त्रासदायक आहे, हे लक्षात तरी येते; परंतु मायावी शक्ती चांगली असल्याचा आभास निर्माण करत असल्याने व्यक्ती फसते’, हे आहे.

२. त्रासदायक आणि मायावी शक्ती व्यक्तीचे कान, डोळे अन् हात यांत जमा झाल्यामुळे व्यक्तीला व्हिडिओ गेम खेळत रहायला अहर्निश ऊर्जा मिळते.

३. त्रासदायक शक्ती व्यक्तीचे मन आणि अहं यांत साठल्याने तिला काहीही सूचणे बंद होते. व्यक्तीची सारासार विचार करण्याची क्षमता न्यून (कमी) होते.

४. त्रासदायक आणि मायावी शक्ती व्यक्तीच्या मज्जातंतूंच्या जाळ्यात साठल्याने व्यक्तीची ‘व्हिडिओ गेम’ खेळण्याची आवड वाढत जाऊन त्याचे रूपांतर व्यसनात होऊ शकते.

व्हिडिओ गेम खेळण्यामुळे होणारी सूक्ष्म स्तरीय प्रक्रिया उपरोल्लेखित सूक्ष्म ज्ञानावर आधारित वर दिलेल्या चित्रातून स्पष्ट होईल.

३. निष्कर्ष

‘व्हिडिओ गेम्स’चा मानवावर होणार्‍या परिणामाच्या केलेल्या अभ्यासातून पुढील सूत्रे लक्षात आली.

अ. व्हिडिओ गेम्स हे मनोरंजनाच्या अन्य माध्यमांप्रमाणेच आहेत. दुर्दैवाने बहुतांश व्हिडिओ गेम्स नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करतात. ही नकारात्मक स्पंदने आणि त्यावर आपण घालवत असलेला वेळ यांची सांगड घातली की, आपल्या लक्षात येते की, व्हिडिओ गेम्स मानवजातीवर किती प्रतिकूल परिणाम करत आहेत !

आ. भारतीय संस्कृती जीवनाच्या प्रत्येक अंगाचे आध्यात्मिकीकरण करायला शिकवते. प्रत्येक कृतीचे आध्यात्मिकीकरण केल्याने त्यातील सकारात्मकता वाढते आणि नकारात्मकता कमी होते. याउलट व्हिडिओ गेम्स नकारात्मकता वाढवणारे असल्याने ते मानवासाठी आणि भारतीय संस्कृतीसाठी हानीकारक आहेत.

– डॉ. (सौ.) नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. ई-मेल : mav.research2014@gmail.com